अनेकदा डोळस व्यक्तींना दमवणारा ‘खजिना शोध’ (ट्रेझर हंट) खेळ दृष्टीहीनांनी मात्र अवघ्या आठ मिनिटांमध्ये पूर्ण केला आणि लपलेला खजिना शोधून काढला. महालक्ष्मी येथील ‘नॅशनल असोशिएशन ऑफ ब्लाइंड’ (नॅब)च्या पुनर्वसन विभागाने आयोजित केलेल्या या स्पर्धेवेळी दृष्टीहीनांनी दाखवलेली चुणूक पाहून डोळसही चकित झाले.
वाटेत बोगदा..उंचवटे..अशा विविध अडचणी असतानाही ‘ब्रेल लिपित’ देण्यात आलेल्या संदर्भाचा आधार घेत स्पध्रेत सहभागी झालेल्या सहा संघांपैकी ‘गोल्ड’ टीमने बाजी मारली. या स्पध्रेत मुंबईतील दृष्टीहीनांसाठी असलेल्या चार महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पध्रेत ३६ विद्यार्थी असल्याने त्यांचे सहा जणांचा एक असे सहा संघ तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना सांघिक भावना समजावी या उद्देशाने ‘नॅब’च्या पुनर्वसन विभागातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते, अशी माहिती केंद्राच्या संचालिका पल्लवी कदम यांनी दिली.  
या स्पध्रेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुर्कस्तानच्या काऊन्सल जनरलही सहभागी झाल्या होत्या. या स्पध्रेला ‘अ‍ॅम्वे अपॉच्र्युनिटी फाऊंडेशनने’ सहकार्य केल्याचेही कदम यांनी सांगितले. या खेळामध्ये हे विद्यार्थी दृष्टीहीन आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आली नव्हती. त्यांना देण्यात आलेली सूचक माहिती ही फक्त ब्रेल लिपीत देण्यात आली होती. या स्पध्रेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे याचा अंदाजही येत असल्याचे कदम यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा