मुंबई: कोविड अगोदर किंवा त्यानंतरच्या काळात मृत्यू झालेल्या कर्जदारांच्या विधवा पत्नीशी सौजन्याने वागा अशा सूचना विधान परिषेदच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. उदयकाल फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील १८० हून अधिक एकल महिलांच्या तक्रारींची माहिती गोळा करून ती डॉ. गोऱ्हे यांच्याकडे सादर केली होती. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे या महिलांचे सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्यांचे उत्पन्नाचे साधन संपले आहे. त्यामुऴे सहकारी बॅंका व सहकारी पतसंस्था ह्यांनी कर्जदारांच्या वारसांना, विशेषत विधवा महिलांना कर्जफेडी बाबत कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. त्यांच्याशी सौजन्याने वागावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
कर्जदारांच्या विधवा पत्नीला सौजन्याची वागणूक द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
कोविड अगोदर किंवा त्यानंतरच्या काळात मृत्यू झालेल्या कर्जदारांच्या विधवा पत्नीशी सौजन्याने वागा अशा सूचना विधान परिषेदच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
Updated: First published on: 19-10-2022 at 20:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treat debtors widows with courtesy suggestion by dr neelam gorhe mumbai print news ysh