मुंबई : रुग्णालयामध्ये हिमोफिलियावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेत केईएम रुग्णालय हिमोफिलियाच्या रुग्णांना एकाच छताखाली, एकाच ठिकाणी उपचार आणि निदान उपलब्ध करून देत आहे. केईएम रुग्णालयात दर बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत बहुविद्याशाखीय हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

माणसाच्या शरीरात रक्त गोठविण्यासाठी फॅक्टर ८ आणि फॅक्टर ९ हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. मात्र हिमोफिलियाग्रस्तांमध्ये हे दोन्ही घटक नसल्याने त्यांच्या शरीराअंतर्गत तीव्र रक्तस्त्राव होऊन सांधे, मेंदू, स्नायूंमध्ये जखमा होतात. यामुळे रुग्णाला प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागते. हिमोफिलिया हा आनुवंशिक आजार आहे. ६० टक्के रुग्ण हे अनुवांशिक, तर ४० टक्के रुग्णांमध्ये हा आजार अन्य कारणांमुळे उद्बवतो.

Prataprao Jadhav
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार, ICMR कडून संशोधन सुरू, केंद्रीय मंत्र्याची माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
vn desai hospital
मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय
Mahatma Phule Jan Arogya Yojana
‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तील रुग्णालयांची स्वतंत्र पथकामार्फत चौकशी!
Prashant Kishor
Prashant Kishor Hospitalised : आमरण उपोषणादरम्यान प्रशांत किशोर यांची प्रकृती ढासळली; रुग्णालयात केलं दाखल
HMPV, Thane Municipal Corporation, Special room,
‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका सतर्क, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
Two patients in Nagpur diagnosed with HMPV
धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…

हेही वाचा – ‘नाका तिथे शाखा’ सुरू करण्याचे राज ठाकरेंचे आदेश

सध्या देशात हिमोफिलियाच्या २० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने हा आजार दुर्लक्षित राहतो. त्यामुळे हिमोफेलिया झालेल्या ९० टक्के रुग्णांची नोंदच होत नाही. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या रुग्णांना तपासण्यासाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे त्यांना होणार त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात दर बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत बहुविद्याशाखीय हिमोफिलिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे रुग्णाला एका ठिकाणी मार्गदर्शन मिळाल्यास रुग्णावर पुढील उपचार करणे सोपे होईल, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.

केईएममध्ये बाह्यरुग्ण विभागात प्रत्येक महिन्यात सरासरी ३०० रुग्ण दाखल होतात. यामध्ये महाराष्ट्रासह बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि चंदीगढ या राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. मात्र, केईएम रुग्णालयामध्ये हे उपचार मोफत केले जातात. केईएम रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑर्थोपेडिक सर्जन, हिमेटॉलॉजिस्ट, दंत, जनरल सर्जन, प्रयोगशाळा अधिकाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत. या रुग्णांना प्रोफिलॅक्सिस थेरेपी दिली जाते, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या हिमेटॉलॉजी विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. चंद्रकला एस यांनी दिली.

हेही वाचा – मुंबईः रिक्षा भाड्यावरून वादानंतर प्रवाशावर अनैसर्गिक अत्याचार; अज्ञात चालकाविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा

केईएममध्ये रुग्णांची नोंद – १,३३०
मेंदूत अति रक्तस्त्राव – ५ टक्के रुग्ण
सांध्यांमध्ये रक्तस्त्राव – ७० टक्के
स्नायूंमध्ये रक्तस्त्राव – १५ ते २० टक्के
मोठ्या शस्त्रक्रिया – वर्षाला २०
छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया – ७० रुग्ण

Story img Loader