दहिसर येथे पक्षीप्रेमींचा विरोध

महानगरपालिकेने मुंबईत पावसाळी दिवसांच्या पाश्र्वभूमीवर सुरू केलेल्या वृक्षछाटणीला पक्षिप्रेमी रहिवाशांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. छाटणीदरम्यान झाडांच्या फांद्यामधील पक्ष्यांची घरटी आणि त्यामधील पिल्ले यांच्याकडे दुर्लक्ष करून कर्मचारी तोडणी करीत असल्याची तक्रार रहिवासी करीत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दहिसरच्या कांदरपाडय़ातील साई कॉम्प्लेसबाहेरील झांडावर बगळ्यांची चार घरटी उद्ध्वस्त झाली तर त्यामधील पिल्लेही मृत पावली. जीर्ण झालेल्या फांद्या पावसाळी दिवसात पडून कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून उपाययोजनात्मक स्वरूपात पालिकेकडून वृक्षछाटणीचे पाऊल उचलले जाते. मात्र पक्षिप्रेमी रहिवाशांच्या याला नेहमीच विरोध असतो. दहिसरमधील साई कॉम्प्लेसबाहेरील झाडांच्या छाटणीदरम्यान बंगल्याच्या चार पिल्लांचा फांद्याखाली दबल्याने मृत्यू झाला. इमारतीच्या बाहेरील गुलमोहर झाडाच्या फांदीवर बगळ्याची चार घरटी होती, पालिकेकडून वृक्षतोडणीसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने निष्काळजीपणे फांदी तोडल्याने पिल्लांना जीव गमवावा लागला, असे साई कॉम्प्लेसचे रहिवासी राजेश जैन यांनी सांगितले.

कंत्राटदाराच्या अशा असंवेदनशीलतेची तक्रार राजेश यांनी विभागाचे साहाय्यक आयुक्त हेमंत पाटील आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना लेखी स्वरूपात दिली आहे.

पावसाळी दिवसात फांद्या पडण्याचे प्रमाण अधिक  असल्याने वृक्षछाटणी करणे गरजेचे आहे परंतु उन्हाळ्याचा काळ हा बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने काळजीपूर्वक झाडांची छाटणी करणेही गरजेचे असल्याचे मत प्राणी संरक्षण कार्यकर्ता सुनीश कुंजू यांनी मांडले.

Story img Loader