मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून, वंदे भारतला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मात्र वंदे भारतचे तिकीट भाडे जादा असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांना ही एक्स्प्रेस परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ सुरू होणार आहे. ही एक्स्प्रेस मध्य रेल्वेवरील कसारा घाटात आणि इतर मार्गावर धावली. तर आता पश्चिम रेल्वेवर ‘वंदे भारत साधारण एक्सप्रेस’ चाचणी घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय बनावटीच्या पहिल्या सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला चार वर्षे पूर्ण झाली. देशात पहिली वंदे भारत नवी दिल्ली – वाराणसीदरम्यान धावली. आकर्षित रचना आणि वेगामुळे या एक्स्प्रेसने प्रवाशांच्या मनात स्थान मिळविले आहे. तसेच देशभरातील अनेक धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत एक्स्प्रेस जोडली गेल्याने प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र वंदे भारतचे प्रवासी भाडे हे उच्च मध्यमवर्गीय गटातील प्रवाशांना परवडणारे आहे. हे भाडे मध्यमवर्गीय प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी, वेगवान प्रवासाची सेवेचा अनुभव घेण्यासाठी ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ चालवण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील अहमदाबाद – मुंबईदरम्यान वंदे भारत साधारण एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. या मार्गावर ही एक्स्प्रेस धावू शकते का, कोणत्या अडचणी आहेत का, अडचणी असतील तर त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या याची पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.