गोपीनाथ मुंडे यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता की, दिल्लीपासून त्यांचे मूळ गाव असलेल्या परळी येथे त्यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली. सगळीकडे अगदी उत्स्फुर्तपणे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. मंगळवारी दिल्ली, मुंबईत आणि आज (बुधवार) परळीत मुंडेंच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मुंडे यांची राजकीय कार्यकिर्द वाखाणण्याजोगी आहे. सामान्य गरीब कुटुंबातून आलेला एक युवक राज्याचा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाला, ही केवळ परळीवासियांसाठी नव्हे तर केंद्रापासून गावातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब होती.