घरची परिस्थिती उत्तम. सगळे लाड पुरवले जात असूनही ८ वीत शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्यांला महागडी खेळणी हवी होती. त्यासाठी त्याने चक्क फेसबुकवरुन एका व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एका मॉडेलचे बनावट फेसबुक अकाऊंट त्याने तयार केले होते. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि चेंबूर पोलिसांनी त्याला अटक केली.
१४ वर्षीय विक्रम पंडय़ा (नाव बदलेले) हा चेंबूर येथे राहणारा विद्यार्थी एका नामांकित शाळेत शिकतो. त्याला महागडी आणि परदेशी खेळणी हवी होती. पण घरचे त्याला घेऊन देत नव्हते. त्यामुळे आपले खेळणे विकत घेण्यासाठी त्याने अजब युक्ती केली. बिग बॉस ४ मध्ये असलेली एक मॉडेल आंचल कुमार हिच्या नावाने त्याने बनावट प्रोफाईल तयार करून अनेकांशी मैत्री केली. मॉडेलशी मैत्री करायला मिळतेय म्हटल्यावर अनेक जण आंचल समजून त्याच्या संपर्कात आले. त्यापैकी एका व्यापाऱ्याला विक्रमने गंडविण्याचे ठरवले. मी कॅनडात असून माझा मोबाईल हरविला आहे आण्यिा व्यापाऱ्याला दिला. मला तात्काळ पैशांची गरज आहे, १० हजार रुपये घेऊन चेंबूरच्या के स्टार मॉलकडे या व्यापाऱ्याला त्याने बोलावले. तेथे माझा मित्र भेटेल त्याला हे पैसे द्या असे सांगितले. ठरल्याप्रमाणे बुधवारी हा व्यापारी तेथे आला. पण आंचल कुमारचा शाळकरी मित्र पाहून त्याला संशय आला व हा प्रकार उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा