तुळशी विवाहाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील रोपवाटिकांमधील तुळशीच्या रोपांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे रोपांच्या किमतीतही वाढ झाली असून एरवीपेक्षा दुप्पट किमतीने रोपांची विक्री होताना दिसते आहे.

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे तुळशीचे लग्न. या दिवशी खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या दिवाळीची सांगता होते. तुळशीच्या विवाहानंतर आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. म्हणून मुंबईत सध्या तुळशीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर तुळशी विवाहासाठी म्हणून तुळशीच्या रोपांनाही मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने रोपांच्या किमतीही वधारून जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दादरच्या टिळक पुलानजीक असणारी ‘फुलराणी’ रोपवाटिका काळ्या, पांढऱ्या, कापुरी अशा विविध तुळशीच्या प्रकारांनी फुलून गेली आहे. तुळशीचे हे सर्व प्रकार फुलराणीचे मालक नागेश कारखानीस आपल्या वांगणीस्थित प्रकल्पातून मागवतात. दिवाळीच्या दिवसात दरवर्षीच तुळशीच्या रोपांना चांगली मागणी असल्याचे कारखानीस सांगतात. रोपवाटिकांमध्ये असणाऱ्या तुळशीच्या किमतीत साधारणपणे वाढ होत नाही. मात्र, रोपांची किरकोळ विक्री करणारे विक्रेते भाव चढवून ठेवतात, असेही त्यांनी ‘लोकसत्ता-मुंबईशी’ बोलताना सांगितले.

 

Story img Loader