सुट्टीतही शाळा; नांदेड जि. प. शाळांत स्वयंशिस्तीचे धडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलं ऐकतच नाहीत.पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसतो..मुलांना टीव्हीने बिघडवले..मुलं मोबाइलवरच खेळत बसलेली असतात..मोठय़ांना नमस्कारही करत नाही..शिस्त म्हणून राहिली नाही..अशा तक्रारी पालक व शिक्षकांकडून सर्रास ऐकायला मिळतात. नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुले मात्र याला अपवाद ठरली आहेत. इथली मुलं सुट्टीच्या दिवशीही शाळेत जातात आणि पालक सायंकाळी टीव्ही बंद करून मुलांचा अभ्यास घेतात. ही मुले पालकांनाच नव्हे तर गावातील ज्येष्ठांनाही वाकून नमस्कार करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांनी प्रयत्नपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने हा शिस्तप्रयोग यशस्वी केला आहे.

खरं तर २०१४ मध्ये नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकायला सुरुवात केली. त्यापूर्वी तेथे फेब्रुवारीपासून अर्धवेळच शाळा चालायच्या. म्हणजे वर्षभरात शाळेसाठी बंधनकारक असलेले तास घेतले जात नव्हते. त्यात बदल करून सुट्टीच्या दिवशी शाळा सकाळी लवकर सुरू करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिमन्यू काळे यांनी सुरू केला. यासाठी मुलांवर अभ्यासाची सक्ती न करता त्यांना महान व्यक्तींची चरित्रे तसेच मुलांचे कुतूहल जागे करणारी गोष्टीची पुस्तके आणि खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले. यामुळे सुट्टीच्या दिवसातही शाळांमधील उपस्थिती ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त झाली.

दुसऱ्या टप्प्यात मुलांना पालक तसेच ज्येष्ठांना वाकून नमस्कार करायला लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याबरोबरच चांगल्या पद्धतीने संवाद साधण्याची सवयही रुजण्यास सुरुवात झाली. भविष्यात ही मुले मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांत आल्यानंतर आत्मविश्वासाने वावरतील, असा विश्वास अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.

दर आठवडा-पंधरवडय़ाला मुलांची परीक्षा घेतानाच महिनाकाठी शिक्षक व पालकांच्या सभेचे आयोजन करण्यात येऊ लागले. यामुळे प्रत्येक महिन्यात पालकांना मुलांची प्रगती समजू लागली. पालकांच्या घरातील अडचणींची शिक्षकांना माहिती होऊ लागली. यानंतरचा मह्त्त्वाचा टप्पा होता सायंकाळी टीव्ही बंद करून पालकांनी मुलांचा अभ्यास घेणे किंवा अभ्यासावर लक्ष ठेवण्याचा. यासाठी वर्षभर जिल्हा परिषदेच्या २२०० शाळांतील सव्वा दोन लाख मुलांच्या घरी शिक्षकांच्या तसेच प्रसारमाध्यमांच्या मदतीने आवाहन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील २५ शाळांमधील ७०० मुलांची निवड करून त्यांच्या घरी जाऊन थेट सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम काळे यांनी राबविला. मुलांच्या अभ्यासावर शिक्षकांप्रमाणे पालकांनी लक्ष ठेवल्यास मुलांची प्रगती चांगल्या प्रकारे होईल, हा उद्देश त्यामागे होता. अपेक्षेप्रमाणे जवळपास ७० टक्के पालकांनी आपल्या घरातील टीव्ही सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत बंद ठेवून मुलांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केल्याचे आढळून आले.

  • सुरुवातीला या टीव्ही बंद मोहिमेला प्रचंड विरोध झाला. यात शिक्षकही होते. परंतु मुलांची प्रगती होऊ शकते. ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक विकास साधायचा असेल तर पालकांचा सहभाग मोलाचा आहे हे पटवून देण्यात आले.
  • आता शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी उभारण्यातही पालकवर्ग पुढे येऊ लागला आहे.
  • यापुढे शाळांमध्ये मुलांना सूर्यनमस्कार व संस्कृत शिकविण्याचा काळे यांचा मानस आहे. त्यासाठी संस्कृत शिकविणाऱ्या शिक्षकांचा संच तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.