सिबिडी येथील स्टेट बँकेतील वीस लाख रुपयांची रोकड जवळच्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मध्ये जमा करण्यास नेत असताना सोमवारी चार लुटारुंनी व्यवस्थापकावर चाँपरचे वार करुन ती रोकड लुटली. चार दिवसापूर्वी कोपरखैरणे येथे अशाच प्रकारे ११ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. एका आठवडय़ात लुटीच्या दोन घटना घडल्याने पोलिसही च्रक्रावून गेले आहेत. सिबिडी सेक्टर ११ येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. तेथून वीस लाख रुपयांची रोकड घेऊन व्यवस्थापक अलोक ब्रम्हाणी एका शिपायासह स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मध्ये जमा करण्यासाठी दुपारी अडीच वाजता निघाले. हिंदी चित्रपटात शोभाव्या अशा प्रकारे त्यातील चार लुटारुंनी व्यवस्थापक ब्राम्हणी यांच्या गळ्यावर चॉपरचे वार केले आणि त्यांच्या हातातील वीस लाखाची रोकड घेऊन पोबारा केला.   

Story img Loader