नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यानिमित्त मध्य रेल्वेने २० रेल्वे गाडय़ांना नाशिक रोड रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा १० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबणार आहेत.

’लोकमान्य टिळक टर्मिनस – छप्रा (११०५९)
’लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा (१२१०१)
’लोकमान्य टिळक टर्मिनस – हबिबगंज (१२१५३)
’छत्रपती शिवाजी टर्मिनस – असनसोल (१२३६२)
’लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर (१२५४२)
’छत्रपती शिवाजी टर्मिनस – गोरखपूर (१२५९८)
’लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर (१५५४८)
’लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी (२२८६५)
’छप्रा – लोकमान्य टिळक टर्मिनस (११०६०)
’हावडा – लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१०२)
’हबीबगंज – लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१५४) आदी गाडय़ांचा त्यात समावेश आहे, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.