मराठीत ट्विट करणे तसे नवीन नाही, पण आता संपूर्ण ट्विटरचे संकेतस्थळ किंवा अॅप मराठीतून उपलब्ध होणार आहे. ट्विटरने शुक्रवारी ही सुविधा अॅपबाजारात दाखल केली आहे.
भारतीय भाषांमध्ये संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहे. यात ट्विटरनेही उडी घेतली असून यापूर्वी कंपनीने संपूर्ण संकेतस्थळ वा अॅप हिंदीत उपलब्ध करून दिले होते. त्या वेळेस अन्य भारतीय भाषांमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध होईल असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. शुक्रवारपासून हे संकेतस्थळ तसेच अॅप मराठी, गुजराती, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ट्विटरवर आपण विविध भारतीय भाषांमध्ये ट्विट करता येणे शक्य होते.
मात्र आता या नव्या सुविधेमुळे संपूर्ण संकेतस्थळ किंवा अॅप आपल्याला त्या भाषेतून दिसणार आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस ट्विटरचे संकेतस्थळ सुरू करतो त्या वेळेस आपण निवडलेल्या भाषेतूनच आपले स्वागत होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
ट्विटरचे संकेतस्थळ आता मराठीत
मराठीत ट्विट करणे तसे नवीन नाही, पण आता संपूर्ण ट्विटरचे संकेतस्थळ किंवा अॅप मराठीतून उपलब्ध होणार आहे. ट्विटरने शुक्रवारी ही सुविधा अॅपबाजारात दाखल केली आहे.

First published on: 02-08-2015 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitters website now in marathi