मुंबई: भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्ह्या दाखल आहे. दरम्यान, सुरत पोलिसांच्या मदतीमुळे या दोन्ही आरोपींना अटक करणे शक्य झाले.

मोईन यामीन कुरेशी (२३) आणि शाहीद अली शहा (१९) अशी या आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत. महिनाभरापूर्वीं या दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपी ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. ५ मार्चला या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होणार होती. याची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दोघांना ऑर्थर रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलीस वाहनातून मुलुंड येथे आणण्यात येत होते.

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त

हेही वाचा : ठाणे वाहतूक कोंडीमुक्तीसाठी साडेसहा हजार कोटींचे तीन प्रकल्प; निविदा प्रसिद्ध; ‘एमएमआरडीए’कडून सल्लागार नियुक्ती

पोलिसांची गाडी घाटकोपरच्या छेडा नगर सिग्नलवर येताच दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गाडीतून पळ काढला. याबाबत त्यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणावरून दोन्ही आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एका ट्रेनमधून जात असल्याचे आढळले. नवघर पोलिसांनी ही माहिती सुरत पोलिसांना दिली. पोलिसांनी सुरत रेल्वे स्थानकावरून या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader