उत्तरप्रदेशातून मुंबईत आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून नेपाळ बनावटीची काबाईन तसेच चार गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. हे गुन्हेगार माओवाद्यांशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ११ च्या पथकाने रविवारी रात्री सापळा लावून महेश ठाकूर उर्फ जयसिंग (२६) आणि विकास दुबे (१९) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९ एमएमची एक परदेशी बनावटीची कार्बाईन, ४ देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसे सापडली. ही कार्बाईन नेपाळ बनावटीची आहे. माओवादी अशा प्रकारची कार्बाईन वापरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for illegal arms
Show comments