मुंबई: सीसी टीव्हीच्या पासवर्डद्वारे समलिंगी संबंधांचे चित्रीकरण मिळवून ते वायरल करणाऱ्या दोघांना लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यात तक्रारदाराचा एक नातेवाईकही आहे. आरोपींनी दागिन्यांच्या कारखान्यातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मिळवले होते. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५), सह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या एक वर्षांपासून तक्रारदारांचे त्यांच्या एका कारागिरासोबत समलिंगी संबंध आहेत. तक्रारदारांचा कारखाना व घरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचा पासवर्ड तक्रारदाराच्या एका नातेवाईकाला माहिती होता. त्याच्या आधारे आरोपी नातेवाईकाने त्यांचे चित्रीकरण केले व ते सहआरोपी राहुल उर्फ जियारुलअली जाफरअली साहू (३९ ) याच्या मोबाइलवर पाठवले. त्यानंतर साहूने व्हाट्स ॲपद्वारे अनेक व्यक्तींना पाठवले. याबाबतची माहिती तक्रारदाराला मिळाल्यानंतर त्याने याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी तक्रारदाराचा नातेवाईक व आरोपी साहूला अटक केली. दोघांनाही न्यायालयापुढे हजर केले असता ११ ऑक्टोेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.