मुंबई : नेदरलॅण्ड येथून टपालामार्फत एमडीएमए अंमलीपदार्थ मागवणाऱ्या दोघांना सीमाशुल्क विभागाने अटक केली. आरोपीने नेदरलॅण्डमधून अशा प्रकारे तीन वेळा अंमलीपदार्थ मागवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ९५ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे.
याप्रकरणी समद उमाटिया (२६) व दानिश शेख (३) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघेही जोगेश्वरी पश्चिम परिसरात वास्तव्यास आहेत. मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात नेदरलॅण्ड येथून आलेले एक पाकीट ५ जून रोजी सीमाशुल्क विभागाने जप्त केले होते. तपासणी केली असता त्यात ९५ ग्रॅम एमडीएमए सापडले. हे पाकिट जोगेश्वरी पश्चिम येथील कमील शेख याच्या नावाने आले होते. या पत्त्यावर जाऊन तपासणी केली असता तेथे कमील शेख राहत नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी टपालावर नमुद केलेल्या मोबाइल क्रमांकावरून शेखशी संपर्क साधला. त्याने उमाटियाला टपाल पाठवल्याचे उघड झाले.
हेही वाचा – Video : गोष्ट मुंबईची – प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास
उमाटियाला ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली. दोघांविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नेदरलॅण्डवरून टपालाद्वारे नियमित अंमलीपदार्थ मागवत असल्याचे चौकशीत उघड झाले. याप्रकरणी ९५ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.