घर विकत घेण्यासाठी दिलेले पैसे परत मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतनगर येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
घाटकोपर येथे राहणारे किरण पवार (३५) याने एसआरए प्रकल्पाअंतर्गत घर घेण्यासाठी विठ्ठल सोनावणे (५५) याला ५० हजार रुपये आगाऊ दिले होते. मात्र सोनावणे याने ते काम केले नव्हते आणि पवार याचे पैसेही परत करत नव्हता. वारंवार मागूनही पैसे मिळत नसल्यामुळे पवार वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातच त्याची नोकरीही सुटली होती. शुक्रवारी पैशावरून सोनावणे याचा मुलगा प्रशांतशी पवारचे भांडण झाले होते. त्यानंतर किरण पवारने घरात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पवारने सोनावणेसह पाच जणांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी विठ्ठल सोनावणे (५५) आणि रहीम (२८) यांना अटक केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा