मुंबई: आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबतची बनावट चित्रफित प्रकरण गाजत असतानाच शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करीत असल्याची तक्रार दादर पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी दादर पोलिसांनी दोन आरोपींना बुधवारी सकाळी अटक केली. याप्रकरणी दादर पोलिसांनी दोघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपण १३ मार्च रोजी शिवाजी पार्क येथून वीर सावरकर मार्गाने पुढे जात असताना कीर्ती महाविद्यालय जंक्शन येथे दोघे आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी दादर पोलीस ठाणे गाठून शीतल म्हात्रे यांना हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार दादर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला होता. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणावरून दोन संशयीताची मंगळवारी चौकशी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांना न्यायालयीने न्यायालयीन कोठडी सुनावली.