मुंबई : मालाड येथील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून कोलकात्याला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई : म्हाडा कर्मचाऱ्यांचा संपाला पाठींबा; सक्रिय सहभाग नसला तरी काळ्या फिती लावून काम

हेही वाचा – राज्यात बहुतांश ठिकाणी जनसुविधा सेवा कोलमडण्यास सुरुवात

आरोपी पीडित मुलीचे नातेवाईक असून त्यांनी कोलकात्यात मुलीला एका खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपी १९ व ३५ वर्षांचे असून कुर्ला पश्चिम येथील रहिवासी आहेत. आरोपींनी पीडित मुलीच्या आई – वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन राहत्या घरातून तिचे अपहरण केले. त्यानंतर मुलीला कोलकात्याला नेऊन तेथे एका खोलीत डांबून ठेवले. मुलीची सुटका झाल्यानंतर तिने याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.