नवी मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी छोटा राजनच्या एका गुंडाला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सुनील उतेकर (३२) आणि राजेश रापार्थी (३९) अशी या दोघांची नावे आहेत.
घाटकोपर येथील पंतनगर परिसरात नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे इमारत बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाम व्यावसायिकाला १५ जानेवारी रोजी मोबाइलवर दूरध्वनी आला. त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी हा तपास घाटकोपर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील, विनायक वस्त यांच्याकडे सोपविला. सहायक निरीक्षक अनिल ढोले यांना गुप्त बातमीदारामार्फत या प्रकरणातील आरोपींचा माहिती मिळविली. त्यानंतर सापळा रचून घाटकोपर पूर्व येथून सुनील व आणि राजेशला अटक करण्यात आली. उतेकर हा छोटा राजन टोळीतील असून रापार्थी हा पूर्वी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सामग्री पुरवित होता. त्यानेच उतेकरच्या मदतीने खंडणीची योजना आखली, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader