मुंबईः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणी आणि मंत्रालयाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे  दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांना मुंबई आणण्यात येत आहे. मुंबईत आणल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी काल देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांनी ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरू केला. मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.  गोरेगाव पोलीस ठाण्याला शिंदे यांचे शासकीय वाहन उडवून देण्याबाबत धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता.  याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३५१(४) व ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून मंगेश अच्युतराव वायळ (३५) व अभय गजानन शिंगणे (२२) यांना ताब्यात घेतले असून दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे.  धमकीचा ई-मेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्या. मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख का केला ? हा ई-मेल कोणी पाठवला ? त्यामागचा उद्देश काय याची चौकशी सुरू केली. त्यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता हा दूरध्वनी बुलढाणा येथून आल्याचे निष्पन्न झाले.

Story img Loader