लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे – कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एकाला नालासोपाऱ्यातून तर दुसऱ्याला माहीममधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ९ ऑगस्टपासून अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुंबई मंडळाकडे एक तक्रार आली. त्या तक्रारीनुसार म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करत त्याद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. संबंधित तक्रारदाराकडून ५० हजार रुपये उकळण्यात आल्याचे, म्हाडाची घरे देण्याच्या नावे फसवणूक होत असल्याचे समोर आले. तर म्हाडाच्या संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल करत बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून बीकेसी सायबर सेलमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसातच दोन जणांना अटक केली आहे.

आणखी वाचा-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा कल यंदा कोणत्या शाखेकडे?अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थांनी नोंदवले सर्वाधिक पसंतीक्रम

बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा नालासोपार्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे अमोल पटेल (२९ वर्षे ) आणि कल्पेश सेवक (३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोघांना सहा दिवसांची पोलीस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाची घरे ही सोडतीद्वारेच सोडत पूर्व आणि सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत म्हाडाच्या माध्यमातूनच वितरित केले जातात. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज दाखल करत म्हाडाच्या सोडतीत सहभागी व्हावे असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.