लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : कंत्राटदाराचे अपहरण करून त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली डोंगरी पोलिसांनी दोघांना अटक केली. तक्रारदाराला आरोपीने दिलेल्या बांधकामाचे पैसे परत करण्यासाठी त्याला धमकावून शिवडी येथील एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अब्दुल अजीज जहरीशा सय्यद (३१) व हनिफ सैफुरेहमान खान (३९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सय्यद हा शिवडी, तर खान हा भायखळा येथील रहिवासी आहे. तक्रारदार जहुरूल्ला सलीम शेख हा डोंगरी येथील रहिवासी असून तो बांधकाम करणारा कंत्राटदार आहे. तक्रारीनुसार, सय्यदने शेखला बांधकामासाठी काही रक्कम दिली होती. ती रक्कम परत करण्यावरून झालेल्या वादातून साजीद वडाळ व मोहलीन जानवर यांनी डोंगरी परिसरात तक्रारदार शेखवर हल्ला केला.

आणखी वाचा-बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई

लोखंडी सळीने मारहाण केल्यानंतर शेखला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्यात आले. त्यानंतर त्याला शिवडी येथील दगडी मशिदी जवळील ईस्माईल मंजील येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्याच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रक्कम दिली नाही, तर शेखला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खान व सय्यदला अटक केली. याप्रकरणी आणखी दोघांचा सहभाग असल्याचा संशय असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.