मुंबईत सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही चोरांनी मुंबईत सोनसाखळी चोरीचा धडाका लावला होता. त्यांच्याकडून ५० हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दोन सोनसाखळी चोर शीव परिसरात येणार असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक मोहन जाधव आदींच्या पथकाने सापळा लावून त्यांना अटक केली. जमील उर्फ समीर ताहीर सिद्धिकी (३०) आणि करण हुसेन अजगरअली शहा (२३) अशी त्या दोघांची नावे आहेत.
 रस्त्यातून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी अवघ्या काही सेकंदात चोरण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांच्या नावावर मुंबईत २२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two chain snatcher arrested