मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी – वेर्णास्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस, नागपूर-मडगाव एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर बदल केला आहे. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार

हेही वाचा – भूखंड लिलाव विक्री प्रक्रियेच्या निविदेला पंधरा दिवसांची मुदतवाढ, मोठमोठे विकासक आले पुढे

कोकण रेल्वेच्या करमळी – वेर्णा विभागात ७ डिसेंबर रोजी दुपारी ४.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२२१८ चंदीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्याआधी ४५ मिनिटे थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस करमळी स्थानकाच्या आधी ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्या देखील विलंबाने धावतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two day block on konkan railway impact on two trains including madgaon mumbai print news ssb