वरळीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून अचानक मोठा दगड खाली कोसळला. त्यामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री ८ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुर्घटनेनंतर दोघांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. साबीर अली ( ३६ ) आणि इम्रान अली खान ( ३० ) अशी मृताची नावे आहेत. ‘फोर सीझन हॉटेल’ची ही इमारत असल्याची माहिती मिळत आहे. हे हॉटेल इमारतीच्या तळमजल्यावर आहे.

हेही वाचा : कामोठे येथे महानगर गॅसच्या स्फोटात कामगारांसह कुटूंब जखमी

वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल कोळी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितल्यानुसार, “हे दोघे जण मजूर होते. ‘फोर सीझन हॉटेल’च्या समोर असलेल्या एका सोसायटीत दोघे काम करत. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर दोघेही चहा पिण्यासाठी आले होते. तेव्हा ही घटना घडली. बांधकामाच्या कामात खबरदारी घेण्यात आली होती की नाही, याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत,” अशी माहिती अनिल कोळी यांनी दिली.