डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. डोंबिवलीतील उमेशनगर भागात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
पालिकेतर्फे उमेशनगर, देवीचा पाडा येथे जवाहरलाल नेहरू अभियानातून मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सिकंदर रॉय (४०) हा २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरला. त्यापाठोपाठ संजय पवार (३५) हाही खाली उतरला. मात्र, त्यानंतर काही कळायच्या आतच चेंबरमधील गॅसने गुदमरून दोघे मरण पावले. हे दोन्ही कामगार कंत्राटी असल्याचे सांगण्यात येते. याबाबत पालिकेच्या संबंधित अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे काम सुरू असताना कल्याण पूर्वेत एक कामगार मरण पावला होता.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा