भाऊचा धक्का येथील न्यू फिश जेटीवर अंजनी पूत्र या मच्छीमार नौकेतील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची खबळजनक घटना मंगळवारी घडली. तर उर्वरित चौघांनाही त्रास झाल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये नौकेच्या मालकाचा समावेश आहे.

हेही वाचा >>> रिया चक्रवतीला दुबईला जाण्यास अखेर परवानगी; दिसताक्षणीच ताब्यात घेण्याबाबतच्या सीबीआयच्या नोटिशीला स्थगिती

vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

अंजनी पुत्र ही मच्छीमार नौका मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किरण भाई तांडेल यांनी न्यू फिश जेटी येथे आणली होती. त्यानंतर सकाळी नौकेतील तीन खणातली मच्छी विकण्यासाठी काढण्यात आली. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक कामगार इतर खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरला. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला. त्यामुळे अन्य दोघे आत उतरले आणि त्यांनी त्या कामगाराला बाहेर काढले. त्याच्याकडे अन्य कर्मचारी बघत असताना आतमध्ये उतरलेले बी. श्रीनिवास यादव (३५) आणि नौकेचा मालक नागा डॉन संजय (२७) हे दोघेही बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर बोटीवरील अन्य तिघेही बेशुद्ध पडले. त्या सर्वांना लगेच जे.जे .रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बी श्रीनिवास आणि नागा डॉन या दोघांना तपासून मृत घोषित केले. सुरेश मेकला (२८) याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा >>> मुंबई : चित्रपटात संधी देण्याच्या नावाखाली ओळख करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

याप्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत आणि बेशुद्ध पडलेले सर्व हे मूळचे आंधप्रदेशचे असून भाऊचा धक्का येथे मच्छी नौकेतून काढण्याचे काम करीत होते. तर नाना डॉन हा दुर्घटना घडली त्या नौकेचे मालक होते.

नेमके काय घडले?

नौकेमध्ये काही खणांमध्ये मासे होते. शिवाय बर्फही होता. मात्र मासे असलेल्या खणांमध्ये पाझरणऱ्या पाण्याचा निचरा न झाल्याने त्या पाण्यापासून विषारी वायू तयार झाला. त्यामुळे नौकेवरील सहाजणांना त्याचा त्रास झाला. त्यामुळेच दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.