वांद्रे टर्मिनस येथे गुरुवारी मध्यरात्री ‘बेस्ट’ बसने दिलेल्या धडकेत अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरील दोघे जण ठार झाले. रामजी बजीचंद (१९) व ईश्वर बालाजी (१७) अशी मयतांची नावे असून निर्मलनगर पोलिसांनी या अपघातप्रकरणी ‘बेस्ट’ बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.
रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. अ‍ॅक्टिव्हा (क्रमांक एमएच ०६ एके ८५७७) या भरधाव जाणाऱ्या स्कूटरला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात उपरोक्त दोघे जण ठार झाले. अपघातग्रस्त स्कूटरची कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या अपघाताला ‘बेस्ट’ जबाबदार नसल्याचा दावा ‘बेस्ट’कडून करण्यात आला आहे.

Story img Loader