मुंबईः वित्तीय गुंतवणूक सल्ला सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीच्या चार संचालकांसह इतर व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दोघांना अटक केली. मुंबईसह ठाणे, कल्याणमधील जवळपास सव्वा लाख ग्राहकांना हजारो कोटी रुपयांना लुबाडणाऱ्या ‘टोरेस’नंतर १०० कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलुंड पोलीस ठाण्यात मंगळवारी ‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू आणि इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेणुगोपाल आणि रावराणे यांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा >>> खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का

कांदिवली येथील व्यावसायिकाने ऑक्टोबर २०२४मध्ये ‘मनीएज’विरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले होते की, तक्रारदार आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी २०२२ ते २०२४ या कालावधीत गुंतवलेल्या दोन कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. ‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’च्या कंपन्यांनी ‘सेबी’कडून अधिकृत परवाना न घेताच पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला भाग पाडले.

प्राथमिक चौकशीनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. इतरही गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम ४२० (फसवणूक), ४०९ ( फौजदारी विश्वासघात), ३४ (सामाईक गुन्हेगारी कृत्य, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा अधिनियम (एमपीआयडी) कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक करण्याची पद्धत

संचालकांनी २०१३मध्ये ‘मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज’ स्थापन केली. त्याअंतर्गत ‘मनीएज इन्व्हेस्टमेंट’, ‘मनीएज फायनकॉर्प’, ‘मनीएज रिअल्टर्स’, ‘मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्यासाठी ‘मुद्रा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ आणि ‘जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ यांची मदत घेण्यात आली. गुंतवणूकदारांना २४ टक्के दराने वार्षिक परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. मात्र, मे २०१४नंतर व्याजानुसार पैसे मिळणे झाले.