मुंबई : सुमारे सव्वासात कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अहमदनगरमधील कंपनीच्या दोन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. आरोपी पती-पत्नी आहेत. तक्रारदार व साक्षीदाराने आरोपींच्या कंपनीला भांडवल व कच्चा माल पुरवला होता. तक्रारदार व साक्षीदार यांना उत्पादन सवलतीच्या दरात देण्याचा व्यवहार ठरला होता. पण आरोपींनी कमी उत्पानाचा पुरवठा करून अपहार केल्याचा आरोप आहे.

संजय भांगे (५५) व स्मीता भांगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही भांगे ऑरगॅनिक केमिकल लिमि. या कंपनीचे संचालक आहेत. त्यांची कंपनी ॲसिटेट केमिकल बनावण्याचे काम करते. तक्रारदार आशिष शहा यांची क्रेम ट्रेड ग्लोबल इम्पेक्स एलएलपी नावाची कंपनी आहे. ते कंपन्यांना कच्चा माल पुरवतात. तसेच त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनाचे वितरणही करतात. साक्षीदार अशोक दंड यांच्यामार्फत शहा यांची भांगे यांच्यासोबत २०२० मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींच्या कंपनीकडे खूप काम आहे, पण त्यांच्याकडे खेळते भांडवल नाही. त्यामुळे भागे यांना कच्चा माल पुरवल्यास त्यातून तयार होणारे उत्पादन सवलतीच्या दरात खरेदी करण्याबाबत तिघांमध्ये व्यवहार ठरला.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

त्यानुसार तक्रारदार व साक्षीदारांनी भांगे यांना १९ कोटी ३५ लाख रुपयांचा कच्चा माल व भांडवल पुरवले होते. त्या बदल्यात साक्षीदार व तक्रारदार या दोघांना केवळ १२ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे इथाईल एसिटेट व सॅनिटाजर पुरवण्यात आले. त्याबाबत तक्रारदार यांनी विचारले असता डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत १५० हजार लिटर अल्कोहोलची कारखान्यात गळती झाल्याचे आरोपीनी सांगितले. याबाबत शहा यांनी २०२१ मध्ये तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती अल्कोहोलची कोणतीही गळती झाली नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर भांगे यांना अहमदनगर येथून चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. येथे आल्यानंतर बुधवारी दोघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.