कुलाबा येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये स्किमर लावून डेटा चोरी प्रकरणात परदेशी व्यक्ती असल्याचा संशय अधिक पक्का होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन परदेशी व्यक्ती एटीएम मशीनमध्ये स्किमर उपकरण लावताना दिसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या दोन व्यक्ती गोऱ्या रंगाच्या आणि भुऱ्या केसांच्या असून ते दोघे युरोपियन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या व्यक्तींबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमधून ४० खातेधारकांच्या खात्यातून लाखो रुपये ग्रीस देशातून काढण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून अ‍ॅक्सिस बॅंकेने यापुर्वीच पाच हजार खातेधारकांचे एटीएम कार्ड ब्लॉक केले आहेत.

Story img Loader