मुंबईः दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली वर्सोवा पोलिासांनी ५२ वर्षीय व्यक्तीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार मुलगी सध्या अनाथाश्रमात राहत असून तिने नुकतीच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित मुलगी १८ वर्षांची असून २०११ ते २०१६ या कालावधीत ती अल्पवयीन असताना आरोपी पित्याने तिच्यावर अत्याचार केला होता. नुकतीच पीडित मुलगी आईला भेटली असता आरोपी पित्याने तिच्या १४ वर्षांच्या लहान बहिणीवरही अत्याचार केल्याचे समजले. त्यामुळे पीडित मुलीने एवढ्या वर्षानंतर धाडस करून स्वयंसेवी संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीशी भांडण झाले असताना आरोपी पित्याने तिच्यावर अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार भादंवि कलम ३७६, ३७६२(जे), ३७६(२)(एन), ३७(२)(फ) सह पोक्सो कायदा कलम १०,१२,४, ६, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.