लासोपारा येथे एका ज्वेलर्सच्या घरी दरोडा टाकून घरातील दोघा पुरुषांची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. दरोडय़ाच्या हेतूनेच ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.
नालासोपाऱ्यातील दिनेश ज्वेलर्सचे मालक दिनेश सोनी आणि त्यांचा भाऊ मदन सोनी यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. या वेळी दरोडेखोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले, तसेच घरातील दोघा भावांची हत्या केली. सोमवारी पहाटे हा सारा प्रकार उघड झाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात  नायलॉनच्या दोरीने गळा दाबून ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ नालासोपारातील सोनारांनी सोमवारी बंद पाळला.

Story img Loader