मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुणे वाहिनीवर कुसगाव (कि.मी ५६/९०० साखळी क्रमांक) आणि ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ (कि.मी ७४/९०० साखळी क्रमांक) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या कामासाठी वरील वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दुपारी १२ ते २ या वेळेत कामादरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा… घराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक
या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक, तसेच छोटी वाहने (चारचाकी) कुसगाव टोल नाक्यावरून जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेला वळविण्यात येतील.
First published on: 11-12-2023 at 19:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two hour traffic block on mumbai pune expressway on tuesday mumbai print news dvr