मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या, मंगळवारी वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर कि.मी १९.१०० येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी १२.०० वा ते २.०० वाजेदरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यादरम्यान दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही

हेही वाचा – कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी ५५.००० येथून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील.

Story img Loader