मुंबई:  कारवाईच्या नावाखाली दुकानदारांकडून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पालिका अधिकाऱ्यांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी पालिकेची बनावट ओळखपत्रे जप्त केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंडमधील एल.बी.एस. रोडवरील एका किराणा मालाच्या दुकानात सोमवारी दुपारी दोघेजण आले. त्यांनी आपण पालिका अधिकारी असल्याची बतावणी करीत प्लस्टिक पिशव्यांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी दुकानात तपासणीही केली. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर त्यांनी दुकानात अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे कारण पुढे करीत दुकानदाराला एक हजार रुपये  दंड भरण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीने दुकानदाराने तत्काळ एक हजार रुपये काढून दिले. मात्र आरोपींनी दुकानदाराला पावती दिली नाही. त्यामुळे दुकानदाराला संशय आला.

Elderly man murdered
Crime News : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Fraudulent tax refund case Arrest of sales tax officer illegal mumbai news
फसवा कर परतावा दिल्याचे प्रकरण: विक्रीकर अधिकाऱ्याची अटक बेकायदा, तातडीने सुटका करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Major changes in Mumbais traffic for swearing-in ceremony
शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

हेही वाचा >>>पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया वैध; प्रवेश प्रक्रियेला आव्हान देणारी विद्यार्थिनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दुकानदाराने तत्काळ ही बाब व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. ही बाब आसपासच्या दुकानदारांनाही समजली. त्यामुळे आसपासचे काही दुकानदार तत्काळ या दुकानात पोहोचले. त्यांनी या दोन्ही आरोपींना पकडले आणि घटनेची मुलुंड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली. पोलिसांना त्यांच्याजवळ महापालिकेची दोन बनावट ओळखपत्रे सापडली. हनीफ सय्यद आणि विजय गायकवाड अशी या आरोपींची नावे असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader