मुंबई : बोरिवली (पूर्व) येथील नॅन्सी कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी इमारतीच्या पाडकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. पाडकामाचा राडारोडा रस्त्यावरून जाणाऱ्या दोन रिक्षांवर पडला. यात एक महिला व एक पुरुष जखमी झाले. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बोरिवली (पूर्व) येथील नॅन्सी कॉलनी परिसरातील गणेश मंदिराजवळील ‘महिंद्र’ इमारतीच्या पाडकामादरम्यान ही दुर्घटना घडली. तीन मजली इमारत पूर्णत: रिकामी होती. या इमारतीचे पाडकाम सुरू असताना राडारोड्याचा काही भाग उंचावरून रस्त्यावरील दोन रिक्षांवर पडला. या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष जखमी झाला आहे.

हेही वाचा – राज्यातील दुष्काळग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दहा पटीने वाढ, ग्लोबल विकास ट्रस्टची उल्लेखनीय कामगिरी

हेही वाचा – मुंबई : पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच या दोघांना आसपासच्या रहिवाशांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत रवीकुमार लखनकुमार राणा (४५) यांच्या डोक्याला, हनुवटीला आणि उजव्या हाताला दुखापत झाली, तर सुमन शुक्ला (३४) यांच्या पाठीला व गुडघ्यांना मार लागला आहे.