एसटीने दिलेल्या धडकेमुळे गाडीचे नुकसान झाले म्हणून एसटी चालकाला मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडतात. पण गुरुवारी रात्री मानखुर्द येथे एका एसटीच्या धडकेमुळे आपल्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून चक्क चालकालाच पळवून नेत १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्याच्या शिवाजीनगर एसटी डेपोची पुणे-मुंबई ही विनावाहक गाडी (एमएच०६एस८२९३) रात्री ९. ४० वाजता मानखुर्द येथे आली. तेथे रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होती. त्यात या गाडीची धडक पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटीस बसली. या अपघातामध्ये कारच्या दरवाजाचे नुकसान झाले. या अपघाताची भरपाई मिळावी यासाठी गाडीतील दोघांनी एसटी चालक माऊली प्रभाकर भडगे (३०) याचे अपहरण केले आणि त्याला मारहाण करत नवी मुंबईतील शिळफाटा येथे त्याच गाडीत घालून नेले.
एसटीतील प्रवासी या भांडणात कोणताही हस्तक्षेप न करता चालक भडगे याला होंडा सिटीच्या चालकाने सोबत नेल्यावर अन्य वाहनाने निघून जाणे पसंत केले. शिळफाटा येथे गेल्यावर माऊलीच्या भ्रमणध्वनीवरून त्याच्या भावाशी संपर्क साधण्यात आला. आपल्या गाडीच्या नुकसानीपोटी एक लाख रुपये घेऊन येण्यास त्यांनी त्याला बजावले. इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर २५ हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. भडगे याच्या भावाने प्रथम १० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम आणून देतो असे सांगितल्यावर भडगेचा एसटी चालकाचा बिल्ला आणि वाहन परवाना या दोघांनी काढून घेतला.  दरम्यान रस्त्यात बेवारस उभी असलेली एसटी महामंडळाची गाडी पाहून वाहतूक पोलिसांनी महामंडळाशी संपर्क साधला. गाडी चालक बेपत्ता असल्याची तक्रार मानखुर्द येथे नोंदण्यात आली. मात्र त्याचवेळी भडगे याच्या भावानेही पोलिसात तक्रार केली आणि भडगे याचा शोध लागला. भडगे यास पळवून नेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळी परिस्थिती चांगली हाताळली
केंद्राकडून दुष्काळी मदत मिळविण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या विनोद तावडे यांच्या आरोपाबाबत पवार म्हणाले की, राज्यांना मदत देण्याबाबत नेमलेल्या समितीचा मी अध्यक्ष आहे. आरोप करणाऱ्यांपेक्षा अधिक माहिती आपल्याकडे असावी, असा माझा समज आहे. त्यानुसार महाराष्ट्राला दोन हजार कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्राने दुष्काळी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, असे कौतुकही त्यांनी केले.

मोदींचा फुगा फुटेल
पंतप्रधानपदाकरिता ज्या नेत्याच्या नावाची बरीच चर्चा होते त्याला हे पद मिळत नाही, असा अनुभव असल्याचे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयजयकार सुरू झाला असला तरी त्यांचा फुगा फुटेल, असे मत पवार यांनी मांडले. राहुल गांधी यांना पंतप्रदानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याचा मुद्दा निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या बैठकांमध्ये कधी पुढे आला नाही, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two kidnapper of st driver arrested
Show comments