लोअर परळ येथे पांडुरंग बुधकर मार्गावरील कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या व्हिक्टोरिया हाऊस इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरचा काही भाग सोमवारी सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले.
व्हिक्टोरिया हाऊस येथे टीपीसीएल कंपनीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. जे. एस. डब्ल्यू कंपनीचे कर्मचारी कार्यालयात हजर असताना अचानक इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये आठ कर्मचारी जखमी झाले. त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी अमृता शुक्ला (३५) आणि मनोज शुक्ला (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिरुद्ध पाटील (३५), प्रकाश नंदी (३५), हेरन दवे (२३), एस. बी. पनीकर (५५), सुरज चंदानिया (३५), राजू जैन (४५), अशी दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत़    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा