मोहरमनिमित्त शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर दोन विशेष महिला गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
मोहरमनिमित्त आझाद मैदान येथे ‘सुन्नी दावते इस्लामी’ या संस्थेतर्फे एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वांद्रे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंब्रा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान दुपारी दोन महिला विशेष गाडय़ा चालविण्यात येत आहेत. वांद्रे येथून दुपारी दोन वाजता तर मुंब्रा येथून दुपारी २.२२ वाजता या गाडय़ा सुटतील. या गाडय़ा सर्व स्थानकांवर थांबणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी, १६ डिसेंबर रोजी मध्य तसेच हार्बर रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Story img Loader