आतापर्यंत आठ लाख कोटींचे करार ; आकडय़ांचा खेळ नको -पृथ्वीराज चव्हाण
‘मेक इन इंडिया’ परिषद महाराष्ट्रासाठी फायद्याची ठरली असून, चार दिवसांत सुमारे आठ लाख कोटींचे गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. नुसता आकडय़ांचा खेळ करण्यापेक्षा प्रत्यक्ष गुंतवणूक व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
सोमवापर्यंत सहा लाख कोटींचे करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत हा आकडा आठ लाख कोटींवर गेल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजेच दोन दिवसांत दोन लाख कोटींच्या करारांची भर पडली आहे.
हे झाले करार
‘स्मार्ट सिटी’, हवाई रुग्णवाहिका, किरकोळ व लघु तसेच मध्यम उद्योग, परडवडणारी घरे या क्षेत्रांमध्ये आज दिवसभरात १८ विविध करार करण्यात आले. नवी मुंबईतील ‘खालापूर स्मार्ट सिटी’ प्रकल्पाकरिता ग्रामस्थांच्या पुढाकाराने करार करण्यात आला. महत्त्वाकांक्षी नैना प्रकल्पांतर्गत खालापूर नगर पंचायत आणि आसपासच्या ११ गावांमधील ग्रामस्थांनी ३५५० हेक्टर्स जमीन संपादित करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. करारानुसार ‘सिडको’ला दहा हजार एकर जमीन उपलब्ध होणार आहे. याशिवाय नैना प्रकल्पात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याकरिता ११ बिल्डरांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार करण्यात आले. ‘सिडको’च्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेबरोबर करार करण्यात आला.
देशातील पहिल्या हवाई रुग्णवाहिकेकरिता राज्य शासन आणि ‘मॅब अॅव्हिएशन’ यांच्यात सामंजस्य करार झाला. प्रत्येकी ५०० किमीसाठी एक अशा दहा हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईत सुमारे पाच लाख परवडणारी घरे बांधण्यासाठी करार करण्यात आला. ही घरे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
किरकोळ आणि लघू तसेच मध्यम उद्योग क्षेत्रात विविध करार करण्यात आले. यात फ्युचर ग्रुपबरोबर ८५० कोटींचा करार करण्यात आला. उद्या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून, आणखी काही करार करण्याचा प्रयत्न आहे. दहा लाख कोटींचा आकडा गाठल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दोन दिवसांत राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक वाढली
आतापर्यंत आठ लाख कोटींचे करार ; आकडय़ांचा खेळ नको -पृथ्वीराज चव्हाण
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-02-2016 at 03:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh crore investment in 2 days