लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे. खेर यांनी स्वतः चोरी झाल्याची माहिती समाज माध्यमावरून दिली होती. या चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख चार लाख पंधरा हजार रुपये आणि ‘मैने गांधी को क्यू मारा’ या फिल्मचे रिल चोरून नेले होते. त्यातील रोख ३४ हजार रुपये व फिल्मची रिल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Junnar man stealing mobile phones, Kalyan railway station, Dombivli railway station,
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत
Theft , Achole police, Vasai , Vasai strange case,
खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास
Two women who stole on the pretext of begging arrested in ulhasnagar crime news
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते अनुपम खेर यांच्या मालकीचे अंधेरीतील विरा देसाई मार्ग परिसरात एक कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री काम संपल्यानंतर कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी एक कर्मचारी कार्यालयात आला होता, यावेळी तेथे चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख रकमेसह फिल्म रील चोरले होते. याबाबतची माहिती कर्मचार्‍यांनी अनुपम खेर यांना दूरध्वनी करून दिली. कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले असता रात्री उशीरा दोन तरुण कार्यालयात शिरल्याचे निदर्शनास आले. या दोघांनी कपाटाच्या खणातील रोख आणि फिल्म रील घेऊन पलायन केले. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांना देण्यात आली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण देऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली. खेर यांच्यावतीने शांताराम पाटील यांनी ही तक्रार केली.

आणखी वाचा-११ झोपु योजनांना अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ? योजना प्रारंभावस्थेत असल्याचा दावा

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात ते दोघेही कार्यालयातून चोरी करून बाहेर आल्यानंतर एका रिक्षातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी याप्रकरणी रफीक शेख (३५) व मोहम्मद दिलशान खान (३०) या चोरांना अटक केली. त्यांच्याकडून ३४ हजार रूपये व फिल्म रील पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस निरीक्षक जयदेव शिंदे यांच्यासह हरीभाऊ बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी तिजोरीही हस्तगत केली. आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का याची तपासणी पोलीस करीत आहेत. तसेच आरोपींनी चोरलेली रक्कम कोठे ठेवली आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader