लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे. खेर यांनी स्वतः चोरी झाल्याची माहिती समाज माध्यमावरून दिली होती. या चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख चार लाख पंधरा हजार रुपये आणि ‘मैने गांधी को क्यू मारा’ या फिल्मचे रिल चोरून नेले होते. त्यातील रोख ३४ हजार रुपये व फिल्मची रिल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते अनुपम खेर यांच्या मालकीचे अंधेरीतील विरा देसाई मार्ग परिसरात एक कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री काम संपल्यानंतर कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गेले होते. दुसर्या दिवशी एक कर्मचारी कार्यालयात आला होता, यावेळी तेथे चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरांनी कार्यालयात प्रवेश करून रोख रकमेसह फिल्म रील चोरले होते. याबाबतची माहिती कर्मचार्यांनी अनुपम खेर यांना दूरध्वनी करून दिली. कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पाहिले असता रात्री उशीरा दोन तरुण कार्यालयात शिरल्याचे निदर्शनास आले. या दोघांनी कपाटाच्या खणातील रोख आणि फिल्म रील घेऊन पलायन केले. याबाबतची माहिती आंबोली पोलिसांना देण्यात आली. कंपनीच्या अधिकार्यांनी पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण देऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली. खेर यांच्यावतीने शांताराम पाटील यांनी ही तक्रार केली.
आणखी वाचा-११ झोपु योजनांना अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ? योजना प्रारंभावस्थेत असल्याचा दावा
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात ते दोघेही कार्यालयातून चोरी करून बाहेर आल्यानंतर एका रिक्षातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी याप्रकरणी रफीक शेख (३५) व मोहम्मद दिलशान खान (३०) या चोरांना अटक केली. त्यांच्याकडून ३४ हजार रूपये व फिल्म रील पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस निरीक्षक जयदेव शिंदे यांच्यासह हरीभाऊ बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी तिजोरीही हस्तगत केली. आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का याची तपासणी पोलीस करीत आहेत. तसेच आरोपींनी चोरलेली रक्कम कोठे ठेवली आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.