मुंबई: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ पारा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा जोर वाढवून, राज्यात पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट आहे. हिमालयात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात दाट धुकेही पडत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तरेतील थंडी राज्याच्या उत्तर भागात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव. उत्तर विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये पारा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा थंडी वाढली आहे. ही थंडी पुढील दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा

दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. पुढील दोन दिवसांत या वाऱ्याचा जोर वाढून राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पीयुक्त, ढगाळ वातावरण निर्माण होऊन हवेतील गारठा कमी होऊन तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होऊन उत्तरेकडील जिल्ह्यांतील तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे

किमान तापमान अकरा अंश सेल्सिअसवर

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम होऊन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी पहाटे पारा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. जळगावात सर्वात कमी ११.०, धाराशिव ११.८, परभणी ११.६, अमरावती ११.९, गोंदिया ११.४, नागपूर ११.२ आणि वर्ध्यात ११.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी १४ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more days of cold temperature will rise again in maharashtra find out what causes climate change mumbai print news ssb