आयएनएस सिंधुरत्न दुर्घटनेत काळ्याकुट्ट रंगातही शौर्याची एक रुपेरी किनार असल्याचे शुक्रवारी समोर आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले लेफ्टनंट कमांडर कपिश मुनवाल आणि लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार या दोघांनी पाणबुडीतून धूर येत असल्याचे ध्यानात आल्यावर तातडीने कार्यवाही करीत अग्निशमन यंत्रणा सुरू केली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे पाणबुडीवरील अन्य ९२ जणांचे प्राण वाचले. मात्र हे करताना या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.
आयएनएस सिंधुरत्नच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नौसैनिकांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद यलो गेट पोलीस ठाण्यात करण्यात आली. या दोघांनाही शुक्रवारी नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयातर्फे मानवंदना देण्यात आली. या दोघांच्याही पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी लेफ्टनंट कमांडर कपिश मुनवालवर (२८) मुंबईतच चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर लेफ्टनंट मनोरंजन कुमारचे (२६) पार्थिव जमशेदपूरला पाठविण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन पार पडल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी सकाळी पश्चिम विभागीय नौदल मुख्यालयातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्या वेळेस पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल शेखर सिन्हा स्वत: जातीने उपस्थित होते. दोन्ही पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णयही या प्रसंगी घेण्यात आला. या घटनेचा दुखवटा म्हणून नौदलाचा ध्वज अध्र्यावर उतरवण्यात आला होता.
व्हाइस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी दोघांच्याही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचा निर्णयही त्वरेने घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
९२ जणांचे प्राण वाचवून दोघांचे बलिदान
आयएनएस सिंधुरत्न दुर्घटनेत काळ्याकुट्ट रंगातही शौर्याची एक रुपेरी किनार असल्याचे शुक्रवारी समोर आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले लेफ्टनंट कमांडर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-03-2014 at 03:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two officers who died in submarine fire save colleagues life