मुंबईः सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे २४०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मोहम्मद फैजली (२४) व स्टीफन किशोर (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. देशान्तर्गत विमान वाहतुकीच्या माध्यमातून  सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने सोमवारी मुंबईतील देशान्तर्गत विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी तामिळनाडूला जाणाऱ्या दोन प्रवाशांवर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवडकरांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आता कृती आराखडा

Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
ACB arrested Municipal Corporation officer Mandar Tari for demanding two crore bribe
लाच मागितल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक
Mumbai Airport Ganja, Ganja seized, Mumbai, Ganja,
मुंबई : विमानतळावरून साडेपाच कोटींचा गांजा जप्त, आरोपीला अटक
After luring woman for marriage for few years businessman took gold from womans house
११वी प्रवेशात गैरप्रकार करणारे अटकेत; आरोपींमध्ये महाविद्यालयातील दोन लिपिकांचा समावेश
Dongri police arrested 45 year old man with one kilo of cocaine
पावणेपाच कोटींच्या कोकेनसह डोंगरीतून एकाला अटक
thane station disabled coaches
ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई

या संशयावरू त्यांना टर्मिनस २ येथून ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्याकडे चार पाकिटे सापडली. त्यातील फैजली याच्याकडील पाकिटामध्ये १२८० ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत ६५ लाख २७ हजार रुपये आहे. याशिवाय किशोरकडे १२८८ ग्रॅम सोन्याची भुकटी सापडली. त्याची किंमत ६५ लाख २७ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोघांकडून एकूण एक कोटी ३० लाख ५५ हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळक्याशी संबंधीत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. हे तस्कर परदेशातून मुंबईत सोने घेऊन येतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळारून देशान्तर्गत विमानतळावर सोने नेण्यात येते. तेथून देशातील इतर ठिकाणी त्याचे वितरण होत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader