मुंबईः सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे २४०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मोहम्मद फैजली (२४) व स्टीफन किशोर (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. देशान्तर्गत विमान वाहतुकीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने सोमवारी मुंबईतील देशान्तर्गत विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी तामिळनाडूला जाणाऱ्या दोन प्रवाशांवर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in