लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गाच्या गोरेगाव चेक नाका पुलावर बेस्टच्या दोन बस आणि एक रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात जॉनी संखाराम ( ४२) आणि सुजाता पंचकी (३८) अशी मृतांची नावे आहेत.

247 best buses accidents reported in 3 years
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mumbai best bus accident
Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Best Bus Accident
Best Bus Accident : “सुरुवातीला बेस्ट बसने तीन रिक्षा आणि काही लोकांना उडवलं आणि…”; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

पोईसर बस आगारातून बस क्रमांक १४५३ (एमएच ०१ एपी ०२२६) आणि बस क्रमांक १८६२ (एमएच ०१ एपी ०७४६) या दोन्ही बस शनिवारी रात्री आगार हस्तांतरणासाठी घाटकोपर आगारात जात होत्या. बस क्रमांक १४५३ संतोष देवूलकर (५३) हे चालवत होते, तर बस क्रमांक १८६२ संतोष घोंगे (४५) हे चालवत होते. साधारणत रात्री १.४५ च्या सुमारास गोरेगाव चेक नाका पुलावर दोन्ही बस आल्या असता, बस क्रमांक १८६२ च्या चालकाने ब्रेक लावले. तसेच बस क्रमांक १४५३ च्या चालकानेही तसेच केले. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस क्रमांक १४५३ बस घसरली आणि बस क्रमांक १८६२ बसगाडीला आणि नंतर रिक्षाला धडकली.

आणखी वाचा-म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३: लवकरच अर्जांची एक लाखाच्या घरात, अनामत रक्कमेसह ७२ हजार अर्ज दाखल

रिक्षातील प्रवासी जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. जॉनी संखाराम यांना दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे रात्री ३:४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रिक्षा चालकाच्या डाव्या गालाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी सखोल तपास करत आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader