मुंबईः वडाळा पूर्व येथे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत मालाड पूर्व येथे सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी २२ वर्षांच्या आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलगी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने एका कारखान्यात नेऊन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी २३ वर्षांच्या आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली.

हेही वाचा – अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच

हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर धावणार १२ विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

पीडित मुलीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. आरोपी पीडित मुलीच्या परिचयाचा आहे. त्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलीला कारखान्यात घेऊन गेला होता. दुसऱ्या घटनेत सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. याबाबतची माहिती पीडित मुलाच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.